गुन्हा आणि वाहन
शहरात घडणार्याप गुन्ह्यांमधील वाहनांचा सहभाग वाढत चालला आहे. पूर्वीच्या वाहनांपेक्षा हल्लीच्या वाहनांचा वेग, चापल्य, सुलभता आणि उपलब्धता यांत देखील लक्षणीय रीत्या वाढ होते आहे. लुटमार, साखळी चोरी (चेनस्नॅचिंग) अथवा हिट ऎन्ड रन सारखे गुन्हे करून गुन्हेगार पसार होत आहेत. अशा वेळी गुन्ह्याची नोंद करावयास तक्रारदार पोलिस चौकीवर गेल्यास वाहन नोंदणी क्रमांक दिल्याशिवाय पोलिस तक्रारीवर कारवाई करू शकत नाहीत असा अनुभव आहे. इतक्या गर्दीत गुन्हेगाराला आणि त्याच्या वाहनाला कसे हुडकायचे असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित केला जातो. वाहन क्रमांक उपलब्ध असल्यास वाहनमालकाचा पत्ता व इतर माहिती मिळून गुन्ह्याची उकल करणे सोपे जाते.
अर्थात सुलभतेने गुन्हे उघडकीला आणावयाचे असतील तर वाहन नोंदणीक्रमांक सुस्पष्टपणे दिसायला हवा. सध्या शहरात फिरत असणार्या वाहनांपैकी पंचवीस ते तीस टक्के वाहनांचे क्रमांक नीट वाचता येतील अशा पद्धतीने वाहनावर प्रदर्शित केलेले नाहीत. म्हणजे गुन्ह्याच्या तपासयंत्रणेतला महत्त्वाचा दुवाच अतिशय कच्चा आहे. गुन्हेगार गुन्हा करून अशा वाहनावरून पळून जात असेल तर पकडला जाणे अशक्यच.
यावर उपाय काय? तर अशी (चूकीच्या पद्धतीने वाहन क्रमांक प्रदर्शित केलेली) वाहने दिसताक्षणीच त्यांच्या चालकांना दंड ठोठावून वाहनावर योग्य पद्धतीने क्रमांक प्रदर्शित करणे. परंतु अजुनही पोलिसांना या गुन्ह्याचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. चूकीच्या पद्धतीने वाहनक्रमांक प्रदर्शित करण्याच्या या गुन्ह्याला वाहतूक पोलिसांना फॅन्सी नंबर प्लेट असे गोंडस नाव दिले असून त्याकरिता रु.१००/- (शंभर रुपये फक्त) इतका नाममात्र दंड ठरविलेला आहे. ही रक्कम इतकी मामुली आहे की प्रचंड संख्येने वाहने अशा फॅन्सी नंबर प्लेट भूषवित आहेत. अशांपैकी दोनशेहूनही अधिक वाहनांची चूकीच्या पद्धतीने क्रमांक प्रदर्शित केलेली छायाचित्रे मी https://picasaweb.google.com/102676953318994666706/FANCYNUMBERPLATES?noredirect=1# इथे ठेवलेली आहेत.
ही छायाचित्रे व वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानावरही टाकली आहेत. यावर वाहतूक पोलिसांची प्रतिक्रिया अशी की सदर वाहन तुम्हाला कुठे आढळले तेही तुम्हीच कळवा. त्यांच्या या सूचनेनुसार मी तीही माहिती त्यांना पुरविली. त्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला फेसबुक पानावर देण्यात आले परंतु प्रत्यक्षात अशी कारवाई झालेली दिसून येत नाही. गेल्या वर्षभरापासून मी अशा वाहनांची छायाचित्रे टाकली आहेत आणि मागील वर्षी ज्या वाहनांची छायाचित्रे टाकली ती वाहने अजुनही त्यांच्या फॅन्सी नंबरप्लेट्स मिरवत असलेल्या मला दिसतात. नाममात्र दंड असल्यामुळेच बहुदा या वाहनांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांना विशेष रस असल्याचे दिसून येत नाहीये. परंतु अशा दुर्लक्षाचे दुष्परिणाम किती घातक आहेत याकडेही पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. अन्यथा मोठा गुन्हा घडल्यावर जाग आल्यास त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
Comments
तुंम्ही कामगिरी उत्तम केली आहे...
पण पोलिसांना असल्या कामात इंट्रेस नसतो,असेच दिसुन येते. मी गणपतीच्या दिवसात(रात्री) एके ठिकाणी काही मुलं दारू पिण्यासाठी एक गाडी(मारुती व्हॅन),काच सरकवुन उघडताना पाहिली होती.नंतर काही वेळानी सगळे आत गेले,हा प्रकार मी तिथे पुढच्याच चौकात दिसलेल्या पोलिसांना सांगितला... तेंव्हा,''जातो जातो...तुंम्ही जावा'' म्हणुन उत्तर मिळालं... जरा वेळानी जाऊन पाहिलं,तर त्या अंधार्या गल्लीत/गाडीत त्यांचं दारुकाम मजबूत सुरु होतं... http://atruptaaatmaa.blogspot.com
आपण तक्रार करत राहावे. त्यांना दखल घ्यावीच लागेल.
धन्यवाद. परवाच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्या तीन युवकांची १०० क्रमांकावर तक्रार केली दोन पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेलेत. त्यांच्याव र्गुन्हा नोंदविला की तोडपाणी केले याची कल्पना नाही. परंतु सदर युवकांकडून मला भविष्यात त्रास होऊ शकेल अशी शंका आल्यामुळे त्यांच्या वाहनाच्या क्रमांकफलकाचे छायाचित्र घेऊन ठेवले आहे.
बाप रे!
बाप रे! तुम्ही इतके फोटो घेतले आहेत. कौतुकास्पद आहे. :-) पण काही नंबर्समध्ये काय गफलत असावी ते कळले नाही.
हे फोटो कुठल्या शहरातील आहेत तेही सांगा. कदाचित आपले उपक्रमी त्या शहरात असायचे आणि त्यांच्या वाहनाचा फोटो तुम्ही घेतलेला असायचा. निदान ते आपली चूक सुधारतीलही. :-)
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसर
क्रमांकातील ठळक गफलती सर्वांच्याच लक्षात येतात. जसे की, नमुन्यादाखल हे छायाचित्र पाहा यात MH-12 FR 8079 या वाहन क्रमांकातील ८०७९ या अंकाना मराठीत अशा प्रकारे दर्शविले आहे की ती इंग्रजी L o v e अशी अक्षरे वाटतात.
https://picasaweb.google.com/102676953318994666706/FANCYNUMBERPLATES#5758971418285443026
https://picasaweb.google.com/102676953318994666706/FANCYNUMBERPLATES#5758971421860998466
याशिवाय इतरही दोष असतात.
१. धातूच्या क्रमांकफलकाऐवजी ऎक्रिलिक / काच अशा पदार्थांचा वापर
२. क्रमांकफलकावर क्रमांकाखेरीज इतर गोष्टी लिहीणे. अनेकदा व्यक्तीचे / पक्षाचे / देवाचे नाव लिहीलेले असते किंवा चित्र / मानचिह्न असू शकते. अगदी वाहतूक पोलीस किंवा पोलिस / माजी सैनिक / आर्मी असे लिहीणे देखीच चूकच आहे. हे लिखाण क्रमांक फलक वगळता वाहनावर इतरत्र करता येते.
३. अतिशय बारीक अक्षरे / अंक रंगविणे.
४. आरशासारखा चकचकीत पदार्थ क्रमांकफलकासाठी वापरणे.
अशा पद्धतीचे दोष असणारी छायाचित्रेही मी पिकासा अल्बममधे ठेवली आहेत. अनेकांना त्यात चूकीचे काय आहे असे वाटू शकेल. परंतु वरील स्पष्टीकरणानंतर शंका दूर होतील अशी आशा आहे. याशिवाय मागचा अथवा पुढचा यापैकी एखादा क्रमांक फलक फारच सदोष असेल - म्हणजे अगदी छायाचित्रावरूनही क्रमांकाचे आकलन होत नसेल अशावेळी त्याच वाहनाच्या दुसर्या (सदोष नसलेल्या) फलकाचेही छायाचित्र संदर्भाकरिता टाकले आहे.
हे ही सांगा
दंडाची रक्कम मामुली आहेच पण समजा की दंड झाला आणि क्रमांक प्रदर्शित करण्यास विलंब झाला किंवा केलाच नाही तर पुढील वेळेस दंडाची रक्कम वाढते किंवा हे कसे चालते?
हायसिक्युरिटी चा पर्याय?
सध्यातरी ह्या गुन्ह्यास वाहतूक पोलीस किरकोळ समजून केवळ १०० रुपये दंड आकारून सोडून देतात. एकदा मात्र मी पिंपरी महापालिकेसमोरील चौकात एका पोलिसाला एका मारुती ८०० वाहनाची ऎक्रिलिक नंबर प्लेट हातानी तोडून टाकताना पाहिले होते. त्याचा युक्तिवाद असा होता की ही नियमबाह्य आहे तर ठेवायचीच कशाला? अगदी असेच हवे. वाहनावरील नियमबाह्य क्रमांक पाटी काढून टाकून त्याजागी नियमात बसणारी क्रमांक पाटी रंगवून बसवून टाकायला हवी. हा सर्व खर्च + दंड वाहनमालकाकडून वसूल केला जावा. असा गुन्हा पुन्हा घडल्यास वाहन जप्त करून त्याची नोंदणीच रद्द करावी.
याशिवाय अजुनही एक उपाय म्हणजे हायसिक्युरिटी नंबर प्लेट्स. हा सर्वात खात्रीचा उपाय आहे. फक्त यात नंबर प्लेट नटबोल्ट्सनी बसविण्याऐवजी वेल्ड करून टाकायला हव्यात.
चांगले काम
तुम्ही एक चांगले काम करीत आहात. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मला सांगा ह्या ज्या देवनागरीतल्या नंबर प्लेटा असतात त्याही बेकायदेशीरच ना?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
रोमन सोडून इतर लिपीतील क्रमांक फलक अवैधच
धन्यवाद. देवनागरी अथवा इतर कुठल्याही प्रादेशिक लिपीतील क्रमांक फलक बेकायदेशीर आहेत. त्याचे पुरेसे स्पष्टीकरण खाली थत्ते साहेबांनी दिलेलेच आहे.
अभिनंदन!!
तोंडाची हवा करणारे बहुत पाहिले. पण समस्यांवर मदत करणारे फारच थोडे असतात.
तुम्ही करत् असलेले काम् कौतुकास्पद् आहे. पण् तुम्ही सांगितल्या प्रमाणे नोकरशाही ला काही रस नाही.
अभिजीत राजवाडे
दखल घेणे भाग पाडूयात.
धन्यवाद.
या धाग्यावर जास्तीत जास्त लोकांनी या प्रकरणी प्रतिक्रिया द्याव्यात म्हणजे नंतर या धाग्याचा दुवा खालील इलेक्ट्रॉनिक पत्त्यांवर पाठविला जाईल.
dcptraffic.pune@nic.in, cp.pune@nic.in, jtcp.pune@nic.in, addlcpcrime.pune@nic.in, dcpcrime.pune@nic.in, chiefminister@maharashtra.gov.in, acs.home@maharashtra.gov.in
याशिवाय आपणही थेट वरील पत्त्यांवर आपल्या प्रतिक्रिया पाठविल्यात तर त्यांना नक्कीच दखल घेणे भाग पडेल.
अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ,
माझा प्रतिसाद प्रकाशित होत नव्हता व < प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. > असा संदेश येत होता म्हणून वर काही अर्थहीन देवनागरी अक्षरांची भर टाकली आहे.
फेसबुक
>>त्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला फेसबुक पानावर देण्यात आले परंतु प्रत्यक्षात अशी कारवाई झालेली दिसून येत नाही.
पोलिसांच्या पानाचा दुवा द्या बघू
धन्यवाद. हा घ्या पुणे वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानाचा दुवा.
धन्यवाद. हा घ्या पुणे वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानाचा दुवा. पुणे वाहतूक पोलीस
+
सहमत.
MVU 6946 या कायनेटिक होंडाच्या नंबरात काय घोळ आहे ते कळलं नाही.
बाकी मराठी नंबरप्लेट ही नक्कीच अवैध आहेत. पण वसंतदादा पाटलांनी शिवसेनेचे पुनरुज्जीवन केल्यावर मराठी अस्मितेच्या आचरट कल्पनांमुळे १९८६ सालापासून असल्या नंबरप्लेट लावण्याची फॅशन आहे.
सर्व राज्यात अशी फॅशन आली आणि उद्या ਪੀਬੀ੦੧ ਕੇ ੬੯੪੬ किंवा ಕೆ ಎ 01 ಜೆ 6946 असा नंबर असलेली गाडी पुण्यात गुन्हा करून गेली तर नंबर नोट करणार कसा?
नितिन थत्ते
राज्य परिवहन
राज्य परिवहनाच्या बसेसवर सुद्धा असाच नंबर असतो.
राज्य परिवहन
मराठी नंबरप्लेटची हौस महाराष्ट्रातच दिसते आहे.
नितिन थत्ते
केरळ
केरळच्या सगळ्या बसेसवर आंग्ल भाषेतच आहेत. पण हे पहा.
हि गाडी कोणत्या राज्यातली आहे? साऊथची आहे एवढच सांगता येईल.
अतिरिक्त क्रमांक गुन्हा नसावा (?)
रोमन लिपीत योग्य जागी व नियमाप्रमाणे क्रमांक दर्शवून त्याशिवाय वाहनावर इतरत्र जास्तीचा असा इतर प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविल्यास तो गुन्हा ठरत नसावा असे वाटते.
परवानगी
प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविल्यास गुन्हा ठरत नाही असे क्रमांक रंगविणार्या व्यवसायिकाने सांगितले, आरटीओतून तशी परवानगी आहे असे त्याचे म्हणणे आहे.
हेच(?)
आरटिओ, काही प्रकारच्या पाट्यांना परवानगी देणे शक्य आहे.
उदा. अमेरिकेतही अशा पाट्या बनवता येतात. माझ्या एका सहकार्याने त्याच्या मुलीच्या नावाची पाटी बनवून घेतली होती. ANANYA अशी. हे कायदेशीर असते.
याचप्रमाणे, इतर कोणत्या प्रकारच्या पाट्यांना परवानगी आहे हे ही माहित असावे.
नाही चालणार
http://www.delhitrafficpolice.nic.in/number-plate-style.htm
या दुव्यावरील शेवटच्या ओळी स्पष्टपणे इंग्रजी खेरीज इतर नंबरप्लेटना प्रतिबंध करतात.
नितिन थत्ते
हे बरोबर आहे.
इंग्रजीशिवाय इतर क्रमांक फलक बेकायदेशीरच आहेत. परंतु, क्रमांक फलकाच्या नियोजित जागांवर (दुचाकी व खासगी हलकी चारचाकी वाहने याकरिता पुढे आणि पाठीमागे तसेच व्यावसायिक व इतर सर्व वाहनांकरिता बाजुंवरही आयताकार जागेत रंगवून) क्रमांक नियमानुसार इंग्रजीत दर्शविलेला असल्यास आपापली प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी वाहनावर इतरत्र एखाद्या ठिकाणी इंग्रजीशिवाय इतर भाषेत अतिरिक्त फलक रंगविलेला असेल तर तो बेकायदेशीर ठरू नये असे नैसर्गिक न्यायानुसार मनापासून वाटते.
सहमत
रोमन अक्षरांसोबत प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविण्यास परवानगी आहे, फक्त प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविण्यास प्रतिबंध आहे.
जून २००२ च्या नवीन नियमानुसार
एमवीयू ६९४६ क्रमांकाची कायनेटीक होंडा १९९० पूर्वी नोंदणी केलेली आहे हे लगेच लक्षात येते. तेव्हाच्या नियमानुसार काळ्या फलकावर पांढरी अक्षरे योग्य होती. परंतु जून २००२ नंतर यात बदल झाला असून आता पांढर्या फलकावर काळी अक्षरे रंगवायला हवीत. हे जुन्या वाहनांनादेखील बंधनकारक आहे. शिवाय सदर वाहन १९९० च्या पूर्वीचे असल्याने त्यास पंधरा वर्षे झाल्यानंतर पुनर्तपासणी व वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे पुढील पाच वर्षांकरिता चालते. म्हणजेच हे वाहन २००५ व २०१० अशा किमान दोन वेळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आले असणार. त्यावेळी त्यांनी वाहन न तपासताच त्यास वैधता प्रमाणपत्र दिले असणार हे उघड आहे. जर का असे पुनर्तपासणी करून वैधता प्रमाणपत्र घेतले नसेल व वाहन तसेच रस्त्यावर हिंडविले जात असेल तर हा अजून एक दंडनीय गुन्हा.
योग्यच आहे
परंतु जून २००२ नंतर यात बदल झाला असून आता पांढर्या फलकावर काळी अक्षरे रंगवायला हवीत.
योग्यच. काही प्रगत देशांत पथकर घेण्यासाठी किंवा निगराणीसाठी (सर्वेलन्स) किंवा वाहनकाट्यासाठी म्हणा ज्या प्रणाली आहेत ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर) हा एक भाग असतो. क्यामेरा लायसन्स प्लेटांवरून नजर फिरवून तो नंबर क्यामेरात बंदिस्त केला जातो आणि मग प्लेटांवरील अक्षरे आणि आकडे टिपून ठेवले जातात. हे काम नीट व्हावे म्हणू ठरावीक फाँट किंवा टंक वापरणे काही देशांत बंधनकारक केले आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अनाठायीं भाषाभिमान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. नितिन थत्ते यांच्या प्रतिसादाशीं सहमत. संख्येतील अंक देवनागरी मराठीत लिहिण्याचा अट्टहास हा भाषेविषयींचा दुरभिमान आहे.ज्यांना आपण इंग्रजी अंक समजतो ते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंक आहेत.केवळ वाहनक्रमांकासाठीच नव्हे तर सर्वत्र(मराठी वृत्तपत्रे,पुस्तके इ.) हेच अंकलेखन असणे बंधनकारक आहे.मोबाईलमुळे हे अंक देशभर सर्व परिचित झाले आहेत.मराठी संकेत स्थळांवर सुद्धा १,२,३,....९ असे अंक लिहिणे आवश्यक नाही.किंबहुना माझ्यामते ते चुकीचे (अवैध) आहे. बालभारतीच्या मराठी भाषेतील इ.पाचवी पासूनच्या पाठ्यपुस्तकांत 1,2,3,...9 असे अंकलेखन आहे.गणिताचे क्षेत्र तरी भाषिक अस्मितेपासून दूर् असावे.
नंबरी प्लेट्स
ह्यावरून आठवले, रवीन्द्र लाड नावाच्या गृहस्थांना नंबर प्लेटांना क्यामेरात बंदिस्त करण्याचा छंद आहे. त्यांच्या ह्या छंदावर लोकप्रभात एक लेखही आला होता. त्यात लिहिले आहे:
"काही ठिकाणी ४१४१ हा आकडा इंग्रजीतून अशा प्रकारे लिहिलेला असतो की त्यातून मराठीतील ‘दादा’ असे अक्षर वाटते. तसेच ४७४७ या इंग्रजी आकडय़ानेही ‘दादा’ अक्षर तयार होते. १२१२ या इंग्रजी आकडय़ातून इंग्रजी ‘आरआर’, २१४ या आकडय़ातून ‘राम’. तसेच राज (२१५१), पवार (४९१२), अमर (३७४२), बॉस (८०५५), नाना ‘७१७१’ अशी इंग्रजी आकडय़ांतून मराठीची अनोखी संगती साधलेले नंबरही त्यांच्या निदर्शनास आले आहेत, पण त्यांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत. आज ना उद्या तेही आपल्या संकलनात असतील याची त्यांना खात्री आहे. या अनोख्या नंबरांतील अक्षरांबरोबरच कुणातरी व्यक्तीवरील ‘निष्ठा’ही प्रतीत होतात. उदा. राज, पवार, दादा, मराठा हे नंबर! ही नावे कदाचित त्यांची स्वत:चीही असू शकतात. तसे असेल तर त्यांना आपल्या नावाविषयीचा सार्थ अभिमानही त्यातून ध्वनित करावयाचा असेल, असे लक्षात आले."
दुवा: नंबरी प्लेट्स
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कलाकारी चूकीच्या स्थळी!
लाडसाहेबांचा छंद चांगलाच आहे. परंतु जे कारागीर स्वत:चे कसब पणाला लावून वाहन क्रमांक फलकावरील अंकांतून अशी अक्षरकिमया साधतात ते आपली कला अयोग्य स्थानी वापरीत आहेत याची खंत वाटते.
आर टी ओ
चर्चा खरतर फक्त नंबरप्लेट वर न चालता आर टी ओ आणि गुन्ह्यांचा उगम अशी हवी. तिथुनच खरी सुरुवात होते. खास करुन एजंटगिरी पासून.
नंबर प्लेटा आणि गुन्ह्यांचा उगम
नंबर प्लेटा आणि गुन्ह्यांचा उगम अशीही चर्चा करता येईल. राज, पवार, दादा छाप नंबर घेणाऱ्या ह्या नमुन्यांचा सर्वे करायला हवा. ह्यांची पार्श्वभूमी काय, ह्यातले किती बिल्डर आहेत, किती जमिनीच्या सौद्यांचे काम करतात वगैरे वगैरे तपासून बघायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अगदी योग्य प्रस्ताव आहे.
या लोकांचा भूतकाळ तर उजळ नसतोच पण असल्या नंबरप्लेटमुळे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही ही भावना मनात जोपासली जाते व रस्त्यावरही दादागिरी सुरू होऊन चालु वर्तमानकाळही गुन्हेगारी स्वरूपाचाच बनतो.
एकदम सहमत
प्रत्येक राजकिय नेत्याचा वरदहस्त असलेले हे लोकं असतात. पोलिसांनी थांबवले की त्या दादा/मामांना फोन करुन लगेच सुटका...
प्रशंसनीय कार्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री.चेतन गुगळे यांचे वाहन क्रमांकासंबंधीचे कार्य प्रशंसनीय आहे.ते तडीस जायला हवे.श्री.गुगळे त्यासाठी प्रयत्नशील आहेतच.आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा.वाहन क्रमांकासंदर्भातील अवैधता आपण सर्वांनी विभागीय परिवहन खात्याच्या(आर.टी.ओ) निदर्शनाला आणली तर? अथवा श्री.चेतन गुगळे यांच्या अर्जावर आपण सह्या केल्या तर? काही सुपरिणाम दिसू शकेल काय?
अर्जाबाबत
चेतन गुगळे संबंधितांपर्यंत (dcptraffic.pune@nic.in, cp.pune@nic.in, jtcp.pune@nic.in, addlcpcrime.pune@nic.in, dcpcrime.pune@nic.in, chiefminister@maharashtra.gov.in, acs.home@maharashtra.gov.in) ह्या धाग्याचा दुवा पोचवणार आहेतच.
ह्याशिवाय अर्जावरही सह्या करता येतील. पण कुठे आणि कशा करायच्या सह्या?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ई-अर्ज (ऑनलाईन पिटीशन) देखील करता येऊ शकेल.
धन्यवाद. अद्याप मी कुठलाही अर्ज बनविलेला नाहीये. जास्तीत जास्त लोकांनी बेकायदेशीर क्रमांक फलकाबाबत निषेधाचा सूर लावावा आणि त्या प्रतिक्रिया या धाग्यामार्फत संबंधितांपर्यंत पोचवाव्या अशी माझी योजना होती. परंतु आपण म्हणता तसा अर्ज देखील करता येईल. हा अर्ज (ऑन-लाईन-पिटीशन) कसा करावा याबाबत तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शनपर सूचना कराव्यात अशी मी विनंती करतो. सध्यातरी आपण आपल्या परिचयातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या धाग्याचा दुवा देऊन त्यांना इथेच निषेधात्मक प्रतिक्रिया देण्यास सुचवू शकता.
छान कल्पना!
नुसतच कळफलक बडवून मोठमोठ्या चर्चा करण्यापेक्षा काहितरी सकारात्मक केल्याचं समाधान तरी मिळेल. तुमचं अभिनंदन.
बाकी, मी एकदा नो-पार्कींग मधल्या फक्त बुलेट सोडून सगळ्या गाड्या उचलून नेताना पाहिलं आहे. बुलेट घ्यायची तेंव्हापासूनची इच्छा आहे. पण तब्येत आणि पाकिट अशक्त असल्यामुळे खोळंबलय! :)
दादा बुलेट घ्याच...
पाकिटाची कल्पना बरोबर आहे. परंतु तब्येतीचा अशक्तपणा फारसा आड येत नाही. मी ऑगस्ट १९९७ ते फेब्रुवारी २०११ पर्यंत बुलेट ३५० सीसी चालवली आहे. जेव्हा चालवायला घेतली होती तेव्हा ९७ साली माझं वजन फक्त ४५ कि.ग्रॅ. होतं. हळूहळू वाढत ते आता ५३ कि.ग्रॅ. झालंय. पण १६५ कि.ग्रॅ. वजनाची बुलेट चालवायला फारशी अडचण आली नाही. ११० किमी प्रति तास इतक्या अत्युच्च वेगाने देखील चालविली आहे. शिवाय मी कधीच ती साईड स्टँडला लावली नाही. कायम मेनस्टँडलाच लावायचो. तेव्हा तब्येतीची फिकीर सोडा. पैसे जमवा अन् घेऊन टाका ड्रीम बाईक.