उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी संकेतस्थळ..
विसोबा खेचर
April 9, 2007 - 3:29 am
राम राम मंडळी,
खालील विषयावर तज्ञ मंडळींकडून थोडी माहिती हवी होती.
१) मनोगत अथवा उपक्रम यासारख्या लेखनसुविधा असलेले मराठी संकेतस्थळ नव्याने निर्माण करावयाचे असल्यास भारतीय रुपायत साधारणतः किती खर्च येतो? ओंकार जोशी यांची गमभन टंकलेखन प्रणाली ही विनामूल्य आहे हे आम्हास ठाऊक आहे. परंतु अन्य खर्चाच्या बाबींची कोणी तपशीलवार माहिती देऊ शकेल काय?
२) एखाद्या व्यवसायिकाकडून (Professional Website Devloper) अश्या प्रकारचे संकेतस्थळ उभारून घ्यायचे झाल्यास त्याची साधारणपणे फी किती पडेल?
3) हे काम पूर्ण होण्यास साधारणपणे किती कालावधी लागतो?
तात्या.
दुवे:
Comments
मानस..
कुठल्याही माहितीची अथवा विचारांची देवणघेवाण करण्याचा दावा बिलकुल न करणारे, आणि दर्जेदार तसेच शेलके विनोद, पाचकट-पांचट गजाली, शिव्याओव्या, सुमार, तसेच दर्जेदार ललीतलेखन, काव्यलेखन करण्याची सुविधा असलेले, सभ्यतेचा, संस्कृतीचा कुठलाही आव अथवा दावा न करणारे, वैयक्तिक अनुभवविश्वावर भरभरून लिहिण्याची मुभा असलेले असे एखादे 'दे धम्माल' टाईप संकेतस्थळ काढायचे आमच्या मनात आहे.
आमच्या पुण्याईमुळे आमच्या काही देशी-विदेशी असलेल्या मराठी मित्रमंडळींनी याकरता आर्थिक साहाय्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
अजून नक्की नाही, पण भविष्यात केव्हातरी असे एखादे संकेतस्थळ काढण्याचा आमचा मानस आहे. तरी त्याबद्दलची पूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा चर्चाप्रस्ताव!
आपला,
तात्या अभ्यंकर.
मायबीबी
मायबीबी या आज्ञावलीचे मराठीकरण पूर्ण होत आले आहे. शेवटचा हात मारणे चालू आहे. मात्र गमभन व विजिविग एडिटर हा संयोग फाफॉ मध्ये व्यवस्थित चालत नाहीये. त्यासाठी थोडा वेळ लागेल असे वाटते.
लवकरच मायबीबी ला हे मायमराठीकरण सुपूर्त करण्यात येईल.
उपलब्ध आहे.
असे स्वातंत्र्य असणारे एक संकेतस्थळ विनामूल्य उपलब्ध, वापरण्यास तयार आहे असे वाटते.
~ तो ~
विसोबा
विसोबा,
तुझे संकेतस्थळ झाले की आम्हाला कळव. आम्ही त्याचे सदस्य होवू.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
श्रद्धा आणि सबुरी
विसोबा,
श्रद्धा आणि सबुरी. खास तुमच्यासाठीच एक नवे संकेतस्थळ उभे होते आहे. येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण होईल.
चित्तरंजन
मदत
तुम्हाला मदत हवी असल्यास सांगा. मी शक्य तेवढी मदत करेल.
पल्लवी
आम्ही ही आहोत!
अश्या प्रकल्पात
आम्ही पण काही कामाला येत असू तर् सांगा!
-निनाद
वा वा तात्या आम्ही आहोत बरं का!
तात्या!
तुंम्ही हे नवे संकेतस्थळ उभे करा आम्ही आहोतच त्यावर!
शिवाय काही लागले तर सांगा हो तात्या हा गुंडोपंत जी शक्य असेल ती मदत या साठी करेल.
तर मग होउन जाउ द्या!
आपला
(नव-सदस्योत्सुक)गुंडोपंत
माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीची शाणपट्टी! ;)/आभार/उत्तरे..
सर्वांचे आभार व उत्तरे....
सर्कीटराव,
पीएचपीबीबी-३ ह्या आज्ञावलीचे मराठीकरण होण्यास एखादा महिना लागेल. त्यावर आधारित संकेतस्थळ आपल्याला सहज बनवता येईल.
धन्यवाद..
आपल्या स्वप्नातील संकेतस्थळ बनवण्याला आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ नयेत, हेच आमचे ध्येय.
पुन्हा धन्यवाद..
मराठी वाचकवर्गाला प्रत्येकाच्या आवडीनुसार संकेतस्थळाचा पर्याय उपलब्ध व्हावा, हीच आमची इच्छा.
मिलिंदराव, आपलं अगदी खरं आहे! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीची शाणपट्टी नसलेलं एखादं संकेतस्थळ असावं असं वाटतं. उत्तम ललीत लेख, व्यक्तिचित्र, संगीत आणि इतर कलांना वाहिलेले लेख, उत्तम काव्य, फालतू, पाचकट, पांचट विनोद, असं दे धम्माल आणि टाईमपास एवढीच ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या संकेतस्थळ असणं ही काळाची गरज वाटते. म्हणूनच थोडीफार माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. सध्या विचार नाही. कामाचं टेन्शनही खूप आहे. आईही हल्ली अधनंमधनं वयापरत्वे आजारी असते. त्यामुळे फारसा वेळही मिळत नाही. पण जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही आपल्याकडे आवश्यक ती तांत्रिक मदत अवश्य मागू!
आम्हि फी म्हणून अण्णांचा शुद्ध कल्याण घेऊ, दस्तुर साहेबांचा केदार घेऊ, गंगूबाईंचा कोमल रिषभ आसावरी तोडी घेऊ, बाबूजींचे गीतरामायण घेऊ. वसंतरावांचा मारवा घेऊ. कुमारांचा चैती भूप घेऊ. किशोरीताईंचा बागेश्री घेऊ
वा वा! काय सुंदर फी मागितलीत! आम्ही आपली ही फी नक्की देऊ. फी परीस फी देणंही होईल आणि ते काय ते म्हणतात ना, माहिती आणि विचारांची देवाणघेवाण का कायसं?, तेही साध्य होईल! ;)
योगेश,
लवकरच मायबीबी ला हे मायमराठीकरण सुपूर्त करण्यात येईल.
धन्यवाद..
तो,
असे स्वातंत्र्य असणारे एक संकेतस्थळ विनामूल्य उपलब्ध, वापरण्यास तयार आहे असे वाटते.
ती आमची स्वतंत्र चावडी आहे. सर्व सुविधा असलेले संकेतस्थळ नव्हे. अर्थात तिथेही कुणीही येऊन अगदी काहीही वायफळ पचकून जाऊ शकतो! माहिती आणि विचारांची देवाणघेवाण नसेल तर आम्ही ते लेखन अधिक एन्करेज करू! ;)
धोंड्या,
तुझे संकेतस्थळ झाले की आम्हाला कळव. आम्ही त्याचे सदस्य होवू.
क्या बात है.. दोघे मिळून धमाल उडवून देऊ. सभ्यतेची आणि सुसंस्कृतपणाची झूल झेपत नाही रे फार काळ! आम्ही किती सभ्य आणि सुसंस्कृत आहोत हे दाखवायला आमचा एखादा लेख, अनुभव, एखादे व्यक्तिचित्रं पुरेसं आहे! सभ्यता आणि सुसंस्कृतपणा नक्की कशाशी खातात याची लहानशी झलक निश्चितपणे दाखवून देऊ. विधाता तेवढी ताकद आमच्या लेखणीला नक्की देईल अशी खात्री आहे!
चित्तरंजन,
श्रद्धा आणि सबुरी. खास तुमच्यासाठीच एक नवे संकेतस्थळ उभे होते आहे. येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण होईल.
अनेक धन्यवाद. पण काही व्यक्तिंपासून आम्ही दूर राहणेच पसंत करू! ;)
पल्लवी, निनाद, गुंडोपंत, आपल्या सर्वांचे आभार..
बघुया. नवीन संकेतस्थळाची कल्पना आमच्या विचारधीन आहे..
तात्या अभ्यंकर.